वीर सावरकर उवाच
प्रभु श्रीरामांनी आपल्या पित्याच्या वचनासाठी वरवर; परंतु राक्षसांचा क्षय करण्यासाठी मुख्यतः राज्य सोडून वनवास स्वीकारला. तेव्हा त्यांचे ते कृत्य महान होते. जेव्हा श्रीरामचंद्रांनी लंकेवर चाल केली आणि अपरिहार्य धर्मयुद्धाला सज्ज होऊन रावणाचा वध केला, तेव्हा त्यांचे ते कृत्य महत्तम होते. श्रीरामाचे अवतारकृत्य आणि श्रीरामाची मूर्ती जोपर्यंत तुम्ही दृढतेने हृदयात धराल, तोपर्यंत हिंदूंनो तुमची अवनती सहज नष्ट होण्याची आशा आहे. तो दशरथाचा पुत्र, तो लक्ष्मणाचा भाऊ, तो मारुतीचा स्वामी, तो सीतेचा पती, तो रावणाचा निहंता श्रीराम जोपर्यंत हिंदुस्थानात आहे, तोपर्यंत हिंदुस्थानची उन्नती सहज शक्य आहे. श्रीरामाचा विसर पडला की, हिंदुस्थानातील राम नाहीसा झाला.
(साभार : ‘लंडनची बातमीपत्र-४४’, ‘विजयादशमीचा उत्सव’, २६ सप्टेंबर १९०९)