सप्तर्षींच्या आज्ञेने नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘तारा यागा’चे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
‘१६.१०.२०२३ या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेने नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘तारा यागा’चे आयोजन करण्यात आले होते. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, साधकांच्या सर्व त्रासांचे निवारण व्हावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी’, हा या यागाचा उद्देश होता. या यागाचे देवाने माझ्याकडून करून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
१. ‘यज्ञकुंडातून गोल आकारात निळ्या रंगाची दैवी ऊर्जा वर आली’, असे दृश्य मला सूक्ष्मातून दिसले.
२. याग चालू असतांना पुरोहित-साधक म्हणत असलेल्या मंत्रांच्या तालावर पाताळातील एक अनिष्ट शक्ती नाचत होती.
३. ‘हीना’ या अत्तराची आहुती चालू असतांना यज्ञकुंडात निर्माण झालेल्या धुरातून हिरव्या रंगाच्या दैवी लहरी निर्माण झाल्या. त्या दैवी लहरी स्वर्गलोकातील काही देवतांपर्यंत पोचल्या.
४. यज्ञकुंडातून गुलाबी, हिरवा आणि पांढरा या रंगांच्या दैवी लहरी एकत्रित स्वरूपात अन् वर्तुळाकारात वातावरणात प्रक्षेपित होत होत्या.
५. गुग्गुळाची आहुती दिल्यावर लाल रंगाची दैवी ऊर्जा वातावरणात प्रक्षेपित होऊ लागली.
६. लघुपूर्णाहुती दिल्यानंतर मला यागातून एक पुरुषदेव वर आलेला दिसला.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१०.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |