स्फोटातील बाधित हिंदु कुटुंबियांना तात्काळ हानीभरपाई देऊन स्फोटाचे अन्वेषण ‘ए.टी.एस्.’कडे देण्यात यावा ! – सकल हिंदु समाजाची मागणी
कराड येथील भीषण स्फोट प्रकरण
कराड – येथील मुजावर कॉलनीत २५ ऑक्टोबर या दिवशी शरीफ मुल्ला यांच्या घरात झालेला स्फोट नेमका कशामुळे झाला ?, याचे कारण फॉरेन्सिक टीमचे (न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या तंत्रज्ञांच्या समूहाचे) साहाय्य घेऊनही पोलीस अद्याप सिद्ध करू शकले नाहीत. मुल्ला यांच्या घरामध्ये गॅस सिलेंडर सुरक्षित असूनसुद्धा पोलीस प्रशासन सदरची घटना गॅस गळतीमुळे झाल्याचे सांगत स्थानिक राजकीय नेत्यांच्या दबावामुळे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत का ? घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येऊन याचा तपास आतंकवादविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात यावा, यांसह विविध मागण्यांचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने मा. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या नावे कराड येथील तहसीलदार विजय पवार, पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, तपास अधिकारी निरीक्षक चव्हाण यांना देण्यात आले.
या वेळी हिंदू एकता आंदोलनाचे प्रांतिक उपाध्यक्ष श्री. विनायक पावसकर, संस्थापक अध्यक्ष श्री. चंद्रकांत जिरंगे, श्री. अजय पावसकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख श्री. काकासाहेब जाधव, श्री. प्रमोद वेर्णेकर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री अनिल कडणे, मदन सावंत, पीडित हिंदु कुटुंबीय यांसह हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री अनिल खुंटाळे, मनोहर जाधव, सागर चव्हाण, संजय कदम, किरण तांबेरे आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात मागण्या आणि उपस्थित करण्यात आलेले प्रश्न
१. ‘स्फोटामध्ये लिक्विड, पावडर अथवा जिलेटिन यांचा समावेश होता का ?’, ‘मुल्ला हे घरामध्ये बाँब बनवत होते का ?’, ‘त्यांचे आतंकवादी संघटनांशी संबंध आहेत का ?’, ‘घटनेच्या दिवशी पोलिसांनी दुपारी मुल्ला यांच्या घरामध्ये हस्तगत केलेला निळ्या रंगाचा अवजड कॅनमध्ये काय होते ?’, ‘पोलीस ते कोठे घेऊन गेले ?’, यांसह अशा अनेक शंकांनी हिंदु समाजामध्ये असुरक्षितता निर्माण झाली असून प्रशासनाची कामातील दिरंगाई पक्षपातीपणाची, तसेच समाजास घातक आहे.
२. स्फोटामुळे बाजूच्या हिंदु कुटुंबियांच्या घरांचे, तसेच जीवनावश्यक वस्तूंचे, दुचाकी यांची मोठी हानी झाली आहे. त्यांचे संसार रस्त्यावर येवूनसुद्धा नगरपालिका प्रशासनाने पीडित कुटुंबियांस साधी भेट देवून चौकशीसुद्धा केलेली नाही.
३. सर्व निष्पाप पीडित हिंदु कुटुंबियांना सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून हानीभरपाई द्यावी. भरपाई मिळेपर्यंत तात्पुरते रहाण्याची आणि घरखर्चाची सोय करण्यात यावी.
४. घायाळ झालेल्या पवार कुटुंबियांची रुग्णालयामधील उपचारांच्या खर्चाची भरपाई देण्यात यावी.
५. अन्वेषण यंत्रणांनी राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता प्रामाणिकपणे तपास करावा.
६. देशामध्ये लव्ह जिहाद, लँड जिहाद, गोवंश हत्या, धर्मांतर, महापुरुषांचा अवमान इत्यादींमुळे हिंदु समाजात असुरक्षितता वाढत चालली आहे. तेव्हा अशा धर्मांध विकृतींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येऊन त्यांना शिक्षा मिळावी.
संपादकीय भूमिका
|