Russia Gold Reserves : रशियाच्या सोन्याचा साठ्याने गाठला विक्रमी उच्चांक !
मॉस्को (रशिया) – आगामी काळातील आर्थिक अनिश्चिततेकडे पहाता गेल्या तिमाहीत रशियाच्या सोन्याचा साठ्यात २ टक्क्यांची वृद्धी झाली. गेल्या काही कालावधीतील रशियाचा हा विक्रमी उच्चांक आहे, असे ‘आर्.आय.ए. नोवोस्ती’ या सरकारी वृत्तसंस्थेने सांगितले. यामुळे आता रशियन सरकारकडे २ सहस्र ३६० टन सोने असून रशिया हा अमेरिका, जर्मनी, इटली आणि फ्रान्स यांच्यानंतर पाचव्या क्रमांकावर आला आहे.
सध्या जगभरात आगामी काळातील आर्थिक अनिश्चितता पहाता अधिकाधिक सोने घेण्याचा विविध केंद्रीय बँकांचा प्रयत्न आहे. ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने दिलेल्या माहितीनुसार गेल्या तिमाहीत चीनने सर्वाधिक सोने विकत घेतले. त्याच्या खालोखाल सोने विकत घेणार्यांमध्ये भारत, तुर्कीये आणि रशियन असल्याचे सांगण्यात आले.