मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण : मुलीवर बलात्कार केल्याचा पालकांचा आरोप
राजकोट (गुजरात) येथे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उजेडात !
राजकोट (गुजरात) – येथील हुडको मार्केटमध्ये भाजी विकणारा आर्यन शसिफ बलोच नावाच्या मुसलमान तरुणाने इयत्ता नववीत शिकणार्या १३ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलगी शाळेत जात असतांना आरोपी बराच वेळ तिचा पाठलाग करत होता. पीडित मुलगी शाळेच्या प्रवेशद्वारात पोचली असता त्याने मुलीचे अपहरण केले. मुलीचे अपहरण झाल्याचे कळताच तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला द्वारका येथे जाणार्या रेल्वेतून अटक केली.
पीडित मुलीच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की, आर्यन बलोच त्यांच्या मुलीच्या नावाने सामाजिक संकेतस्थळावर खाते चालवत होता. त्याच्याकडे त्यांच्या मुलीची छायाचित्रेही होती. त्या माध्यमातून तो त्यांच्या मुलीला ब्लॅकमेल करत होता. आरोपी मुसलमान तरुणाने त्यांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकागुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांध मुसलमानांचे असे धाडस होऊ नय, असे हिंदूंना वाटते ! |