इस्रायलच्या भारतीय वंशाच्या सैनिकाचा मृत्यू !
तेल अविव (इस्रायल) – हमासशी चालू असलेल्या युद्धात इस्रायलच्या भारतीय वंशाच्या एका सैनिकाचा मृत्यू झाला. हलेल सोलोमन असे त्याचे नाव आहेत. इस्रायलच्या डिमोना भागात मोठ्या संख्येने भारतीय वंशाचे इस्रायली नागरिक रहातात. या भागाला ‘लिटिल इंडिया’ (छोटा भारत) असे म्हटले जाते. डिमोना शहराचे महापौर बेनी बिट्टन यांनी हलेल याच्या मृत्यूची माहिती दिली.
सौजन्य एएनआय न्यूज
हमास गाझातील रुग्णालयातून चोरी करत आहे इंधन !
हमासचे आतंकवादी गाझा पट्टीतील रुग्णालयातून इंधन चोरी करत असल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे. या संदर्भात इस्रायलच्या सैन्याकडून एक ऑडिओ प्रसारित करण्यात आला आहे. यात हमासचा कमांडर एका रुग्णालयाच्या प्रमुखाशी आणि एका सामान्य नागरिकाशी चर्चा करत आहे. यात हे तिघेही इंधनाविषयी बोलत आहेत.