केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांना ठार मारण्याची धमकी
थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी राज्याच्या पोलीस मुख्यालयात एका अज्ञात व्यक्तीने दूरभाष करून दिली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ३ दिवसांपूर्वीच केरळच्या एर्नाकुलम्मध्ये ख्रिस्त्यांच्या प्रार्थनासभेत झालेल्या ३ बाँबस्फोटांत ३ जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना आलेल्या धमकीकडे गांभीयाने पाहिले जात आहे.