Pope Francis Two State Solution : युद्ध समाप्त करण्यासाठी द्विराष्ट्राची आवश्यकता ! – पोप फ्रान्सिस
हमास-इस्रायल युद्धावर पोप फ्रान्सिस यांचे मत
व्हॅटिकन सिटी – इस्रायल आणि पॅलेस्टाईन हे २ प्रकारचे लोक आहेत, ज्यांना एकत्र रहायचे आहे. यावर उपाय म्हणजे द्विराष्ट्र, एक इस्रायल आणि दुसरे पॅलेस्टाईन, असे मत ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी व्यक्त केले. ते इटलीतील वृत्तवाहिनी ‘आर्.ए.आय.’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
सौजन्य विऑन
१. पोप पुढे म्हणाले की, ही समस्या सोडवण्यासाठी ‘ऑस्लो करारा’त चांगल्या प्रकारे व्याख्या करण्यात आली आहे. यात दोन देश आणि विशेष दर्जा असणारे जेरूसलेम यांची बाजू मांडली आहे.
२. पोप यांनी आशा व्यक्त केली की, हमासच्या आक्रमणानंतर चालू झालेल्या या युद्धाचा क्षेत्र विस्तार टाळता येऊ शकतो. युद्ध नेहमीच पराजित होत असते. याखेरीज ज्यूविरोधी भावनेत वाढ झाल्यावरून पोप यांनी चिंता व्यक्त केली.
काय आहे ‘ऑस्लो करार’ ?
वर्ष १९९३ मध्ये तत्कालीन इस्रायली पंतप्रधान यित्झाक राबिन आणि ‘पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायजेशन’चे नेते यासिर अराफात यांच्यात नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे झालेल्या बैठकीत पॅलेस्टाईन स्वायत्त देश म्हणून स्थापन करण्याविषयी करार झाला होता. यालाच ‘ऑस्लो करार’ म्हटले जाते.