नवरात्रीनिमित्त झालेल्या भक्तीसत्संगांत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद़्गल यांना आलेल्या अनुभूती
वर्ष २०२१ मध्ये नवरात्रीनिमित्त विशेष भक्तीसत्संग आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी सौ. वैशाली मुद़्गल यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. भक्तीसत्संगांत मधे मधे सुगंध दरवळण्याची अनुभूती येणे
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ प्रतिदिन भक्तीसत्संगात श्री दुर्गामातेच्या वेगवेगळ्या कथा सांगत असतांना तसा भाव माझ्या मनात निर्माण होत होता. भक्तीसत्संगांत मला मधे मधे सुगंध दरवळण्याची अनुभूती येत होती.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कक्षाकडे पाहिल्यावर ‘तेथे स्वर्गातील देवता देवीची आरती करत आहेत’, असे दिसणे
एकदा मी भक्तीसत्संग संपल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कक्षाकडे पाहिले. तेव्हा ‘तो कक्ष नसून देवीचे मंदिर आहे. तेथे घंटानाद होत आहे. तेथे देवीची पूजा आणि आरती चालू आहे, तसेच तेथे स्वर्गातील देवता येऊन देवीची आरती करत आहेत’, असे मला दिसले.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ देवीविषयी सांगत असतांना ज्ञानगंगा, भावगंगा आणि अमृतगंगा यांचे स्मरण होऊन ‘त्या गंगांमध्ये माझा देह, मन अन् बुद्धी यांची शुद्धी होत आहे’, असे मला जाणवले.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ भक्तीसत्संग घेत असतांना मधे मधे मला सिंहाच्या गर्जना आणि अनेक दैवी नाद ऐकायला येत होते.
५. भक्तीसत्संगांमुळे मनातील अनावश्यक विचारांचे प्रमाण न्यून होऊन देवी सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असल्याचे लक्षात येणे
‘भक्तीसत्संग संपू नये’, असे मला वाटायचे. ‘स्वप्नातही मी भक्तीसत्संग ऐकत आहे’, असे मला वाटायचे. त्यामुळे माझ्या मनातील अनावश्यक विचारांचे प्रमाण न्यून झाले आणि ‘देवी मला सकारात्मक ऊर्जा प्रदान करत आहे’, हे माझ्या लक्षात आले.
६. भक्तीसत्संगामुळे स्वभावदोष आणि अहं यांवर चिंतन होऊन ‘कोणते गुण वाढवायचे ?’, हे शिकायला मिळणे
प्रतिदिन ‘भक्तीसत्संगांत श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ कोणत्या देवीचे गुण सांगतील ?’, अशी मला उत्सुकता वाटायची. या भक्तीसत्संगांतून माझ्यातील अनेक स्वभावदोष आणि अहं यांवर माझे चिंतन झाले. ‘कोणते गुण वाढवायचे ?’, हे मला शिकायला मिळाले.’
– सौ. वैशाली मुद़्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१०.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |