पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून चिखली येथे ‘गोसंवर्धन केंद्र आणि गोशाळा’ चालू करण्याचा निर्णय !
पिंपरी (जिल्हा पुणे) – शहरामध्ये गायी, बैल आदी गोवंशियांची संख्या अनुमाने ७०० एवढी आहे. त्यांच्या संगोपनासाठी महापालिका प्रशासनाकडून चिखली येथे ५ एकर जागेत ‘गोसंवर्धन केंद्र आणि गोशाळा’ चालू करण्यात येणार आहे. यामध्ये महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.
शहरामध्ये मोकाट जनावरे रस्त्याच्या मध्यभागी बसून असतात. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोेंडी होण्याच्या घटना घडलेल्या आहेत, तसेच लहान-मोठ्या अपघाताच्या घटनाही वारंवार घडतात. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून ‘गोशाळा’ चालू करण्याची अनेक वर्षे मागणी होत होती. यावर महापालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत चिखली येथील पाटीलनगर येथील इंद्रायणी नदीच्या शेजारील जागेमध्ये ‘गोसंवर्धन आणि उपचार केंद्र, गोशाळा’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
संपादकीय भूमिका
|