इस्रायलवरील आक्रमणातून बोध घेत भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल उचलणे आवश्यक ! – ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘सेक्युलॅरिजम’च्या (निधर्मीवादाच्या) आड हमासचे समर्थन’ !
इस्रायलने हमासच्या युद्धात केलेल्या चुकांमधून बोध घेऊन भारताने देशांतर्गत शत्रूंचा वेळीच बीमोड करणे आवश्यक !
मुंबई – भारताने रशिया-युक्रेन युद्धाच्या आव्हानाला कूटनीती वापरून एका संधीमध्ये रूपांतर केले. त्याचप्रमाणे सध्या इस्रायलवर हमासने केलेल्या आक्रमणातून बोध घेऊन भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल उचलणे आवश्यक आहे. इस्रायलच्या या सर्व चुकांमध्ये भारताने पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे.
भारतियांमध्ये राष्ट्रभक्ती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शिकवणीनुसार कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याची सिद्धता निर्माण केली पाहिजे, असे उद़्गार ‘युद्ध सेवा मेडल’ प्राप्त ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘सेक्युलॅरिजम’च्या आड हमासचे समर्थन’, या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.
भारताने बाह्य शत्रूंसह देशविरोधी शक्तींच्या विरोधात लढले पाहिजे ! – मेजर सरस त्रिपाठी (निवृत्त)