Mosab Hassan Yousef : हिंदूंना कशाचीच अडचण नसते, तर बहुतांश हिंसेच्या घटनांमागे इस्लामवादीच का ?
हमासच्या संस्थापकाच्या मुलाचे वक्तव्य !
गाझा (पॅलेस्टाईन) – भारतियांना कशाचीच अडचण नाही. हिंदूंना अन्य धर्मियांच्या सहअस्तित्वाची अडचण नाही. ख्रिस्ती अथवा ज्यू यांनाही सहअस्तित्वाची अडचण नाही. मग हिंसाचार प्रत्येक वेळी इस्लावाद्यांकडूनच का केला जातो ? हे खरे आहे की, कट्टरतावादी सर्वत्र आहेत; परंतु बहुतांश वेळा हिंसा ही इस्लामवाद्यांकडूनच केली जाते, हे आपण स्पष्टपणे आणि मोठ्याने सांगितले पाहिजे जेणेकरून हे थांबेल, असे विधान हमासच्या सहसंस्थापकाचा मुलगा मोसाब हसन यूसुफ याने केले.
Mosab Hassan Yousef, the son of #HamasTerrorrists‘ co-founder on religious extremism!
WHAT DID HE SAY?#Hindus have no problem, Christians and Jews also co-exist. So why does the violence only come from #Islamists? There is a need to eradicate #Hamas and any other Islamist… pic.twitter.com/sFM3pehCid
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 1, 2023
१. काही दिवसांपूर्वी यूसुफ याने म्हटले होते की, ७ ऑक्टोबर या दिवशी दक्षिण इस्रायलमध्ये हमासने जे आक्रमण केले आणि आतंकवाद्यांनी जे क्रौर्याचे प्रदर्शन घडवले, त्यावर मला कोणतेच आश्चर्य वाटले नाही.
२. यूसुफ याने एका भारतीय इंग्रजी वृत्तवाहिनीशी केलेल्या वार्तालापात म्हटले की, भारतियांनी हमासच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. याचे कारण असे की, हमास एक कट्टरतावादी संघटना आहे. नागरिकांवर आक्रमण करण्याचा हमासचा मोठा इतिहास आहे. हमासच्या स्थापनेपासून त्यांचे एकच लक्ष्य आहे आणि ते म्हणजे ‘इस्रायलला नष्ट करणे.’ त्यांना इस्रायलचे अस्तित्व मान्य नाही.
Indians have no problem. Hindus have no problem with the rest of the world. We coexist, Christians coexist, Jews coexist. So why only it’s coming from the Islamists all the time, this violence?: @MosabHasanYOSEF, son of Hamas founder, speaks to @PadmajaJoshi #HamasGazaConflict… pic.twitter.com/BfQMYGuNCS
— TIMES NOW (@TimesNow) October 31, 2023
कोण आहे मोसाब हसन यूसुफ ?
मोसाब हसन यूसुफ हा हमास या आतंकवादी संघटनेचा सहसंस्थापक शेख हसन यूसुफ याचा मोठा मुलगा आहे. २००० च्या दशकाच्या आरंभी त्याने ‘शिन बेट’ या इस्रायली संरक्षण यंत्रणेवर होणार्या आतंकवादी आक्रमणाला अपयशी केले होते. यावरून त्याला ‘ग्रीन प्रिंस’ ही उपाधी देण्यात आली. ४५ वर्षीय युसूफ याने सांगितले की, त्याचा जन्म पॅलेस्टाईनमधील रामल्लामध्ये झाला होता आणि त्याला वर्ष १९८६ मध्ये हमासच्या स्थापनेचा दिवस लक्षात आहे.
संपादकीय भूमिकापॅलेस्टाईन आणि पर्यायाने हमासचे समर्थन करणारे काँग्रेस, एम्.आय.एम्. यांसारखे राजकीय पक्ष, पुरो(अधो)गामी संघटना आणि भारतीय मुसलमान यांना आता यावर काय म्हणायचे आहे ? |