सातारा जिल्ह्यात १० नोव्हेंबरपर्यंत शस्त्र आणि जमावबंदी आदेश
सातारा, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) – जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ३१ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंत सातारा जिल्ह्यात शस्त्र आणि जमावबंदी आदेश दिले आहेत. कुणीही जवळ शस्त्र बाळगले अथवा ५ किंवा त्याहून अधिक संख्येने एकत्र आले, तर या आदेशाचे उल्लंघन केल्याचे समजून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हे आदेश मुंबई पोलीस अधिनियम १९५१ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम २०१४ च्या कलम ३७(१)(३) नुसार जिल्ह्यातील संबंधित अधिकारी आणि विभाग यांना दिले आहेत.