मुंबई पोलिसांना धमक्यांचे येणारे अधिक संपर्क फसवे !
मुंबई – अमुक ठिकाणी घातपात होणार आहे, अशा स्वरूपाच्या धमक्या देणारे फसवे संपर्क आणि संदेश आल्याने पोलिसांना मनःस्ताप होत आहे. गेल्या ९ मासांत खोटी माहिती देणारे अथवा अफवा/धमकीचे संपर्क १०० हून अधिक आले होते. यातील ९९ टक्के गुन्ह्यांत पोलिसांनी आरोपींना अटक केली. या प्रकरणांमध्ये खोटी माहिती प्रसारित करणे अथवा धमकी दिल्याप्रकरणी गुन्हे नोंद होतात; मात्र आरोपींना अशा प्रकरणांत लवकर जामीन मिळतो. संपर्क केल्यावर धमक्यांतील खरेखोटेपणा सिद्ध करण्यात पोलिसांचा वेळ वाया जात आहे.
संपादकीय भूमिकाहे प्रकार थांबण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत ! |