चीनच्या २ आस्थापनांनी मानचित्रांवरून इस्रायलचे नाव हटवले !
बीजिंग (चीन) – चीनच्या ‘बायडू’ आणि ‘अली बाबा’ या आस्थापनांनी त्यांच्या संकेतस्थळांवरील मानचित्रातून इस्रायलचे नाव हटवले आहे, असे वृत्त प्रसारित झाले आहे. ‘बायडू’ने इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या सीमा दाखवल्या आहेत; मात्र त्यावर या दोघांचीही नावे लिहिण्यात आलेली नाहीत. चिनी भाषेमध्ये लिहिण्यात आलेल्या या मानचित्रांवर लहान देशांचीही नावे आहेत; मात्र इस्रायलचे नाव नाही. चीनने इस्रायल आणि हमास युद्धात पॅलेस्टाईनचे समर्थन केले होते.