मेट्रो मार्गांना महापुरुषांची नावे द्यावीत ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते
पुणे – येथील मेट्रो मार्गांना महापुरुषांचीच नावे द्यावीत, इतर कोणतीही नावे आम्ही खपवून घेणार नाही, अशी चेतावणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. मेट्रो प्रशासनाने ‘मेट्रोमध्ये रोजगार निर्मितीसाठी स्थानिक आणि भूमीपुत्र यांना प्राधान्य द्यायला हवे’, असे मतही त्यांनी व्यक्त केले. येथील मेट्रोच्या सिव्हील कोर्ट मेट्रो स्थानक येथे दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या प्रसंगी ते बोलत होते.