अल्पसंख्य समाजाच्या नावावर केले जाणारे फसवे राजकारण !
‘अल्पसंख्य समाज, म्हणजे केवळ मुसलमान’, अशी अनेकांची समजूत असते. त्या समजुतीपोटी चुकीचेे विचार व्यक्त होतात; पण झाकीर हुसेन, फक्रुद्दिन अली अहमद, महंमद हिदायतउल्ला आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे मुसलमान ‘भारताचे राष्ट्रपती’ झालेले आहेत. ‘एकही मुसलमान भारताचा पंतप्रधान आतापर्यंत झालेला नाही’, अशी खंत असेल, तर तसे होण्याला देशातील कथित धर्मनिरपेक्षताच अधिक उत्तरदायी आहे. काँग्रेसची सत्ता भारतात ५९ वर्षे असतांना या सत्ताकाळात एकाही मुसलमान नेत्याला पंतप्रधान का बनवण्यात आले नाही ? काँग्रेसचे मनमोहनसिंह १० वर्षे पंतप्रधान होते आणि ते अल्पसंख्य समाजाचेच होते.