तेलंगाणामध्ये भारत राष्ट्र समितीच्या खासदाराच्या पोटात अनोळखी व्यक्तीने खुपसला चाकू !
भाग्यनगर (तेलंगाणा) – राज्यातील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचे खासदार कोथा प्रभाकर रेड्डी यांच्यावर सिद्धीपेठ येथे विधानसभा निवडणुकीचा प्रचार करतांना चाकूद्वारे प्राणघातक आक्रमण करण्यात आले. येथे एका अनोळखी व्यक्तीने रेड्डी यांच्या पोटात चाकू खुपसला. यात घायाळ झालेल्या रेड्डी यांना सिकंदराबाद येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. चाकू खुपसणार्या व्यक्तीला भारत राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांनी पकडून चोपले. त्यानंतर पोलिसांनी त्याला कह्यात घेतले. त्याची चौकशी करण्यात येत आहे. या आक्रमणामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
संपादकीय भूमिका
|