प्रदूषणामुळे ४८ मत्स्य प्रजाती नष्ट होणार !
मुंबई, ठाणे येथील खाड्यांचे वास्तव !
मुंबई – मुंबई, ठाणे येथील खाड्यांचे प्रदूषणामुळे नाल्यात रूपांतर होत आहे. त्यातील ४८ मत्स्य प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या खाड्यांमध्ये वर्ष १९९० च्या तुलनेत ३० ते ४० टक्के मासळी उपलब्ध असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.
पर्यावरण अभ्यासकांच्या मते प्रदूषण पातळीत वाढ झाली आहे. माशांची अंडी देण्याची ठिकाणे चिखल आणि रासायनिक कचर्याने भरलेल्या जागा ही आहेत. त्यामुळे संवेदनशील असलेले मासे तेथे अंडी घालत नाहीत. त्याचाच परिणाम म्हणून त्यांच्या प्रजाती कायमस्वरूपी नष्ट होणार आहेत.
संपादकीय भूमिका :प्रदूषण रोखण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न करणे आवश्यक ! |