विविध नेत्यांनी केेलेल्या ‘हेट स्पीच’च्या विरोधात बेळगाव येथील पोलीस ठाण्यात तक्रार !
१५० हून अधिक हिंदूंची उपस्थिती !
बेळगाव – तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलीन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडू येथील द्रमुकचे खासदार ए. राजा, पुरोगामी पत्रकार निखिल वागळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या विरोधात (‘हेट स्पीच’च्या) शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. ही तक्रार साहाय्यक पोलीस आयुक्त एन्.व्ही. बरमनी यांनी स्वीकारली.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुधीर हेरेकर आणि श्री. हृषिकेश गुर्जर, सौ. अर्चना लिमये, सौ. प्रचीती हळदणकर, सौ. सुनंदा कंग्राळकर, हिंदुत्वनिष्ठ श्री. मारुति सुतार, धर्मप्रेमी सर्वश्री देवदत्त मांजरेकर, नागेंद्र लांडे, अरविंद दड्डिकर, सुनील धर्माधिकारी, संजय पवार, विजय मेलगे, सदानंद मासेकर, पवन धोंगडी, अमर चौधरी, ज्ञानेश्वर कुंभार यांसह १५० हून अधिक हिंदु बांधव उपस्थित होते.