फादर बोलमॅक्स परेरा यांचा उच्च न्यायालयात गुन्हा रहित करण्यासाठी अर्ज
पणजी, ३० ऑक्टोबर (वार्ता.) – वास्को पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरणी फादर बोलमॅक्स परेरा यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केलेला आहे. हा गुन्हा रहित करावा, या मागणीसाठी फादर परेरा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात याचिका प्रविष्ट केलेली आहे. या याचिकेवर ६ नोव्हेंबर या दिवशी सुनावणी होणार आहे.
चिखली, वास्को येथील चर्चचे फादर बोलमॅक्स परेरा यांनी चर्चमध्ये प्रार्थनेच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. याविषयी चलचित्र सामाजिक माध्यमात प्रसारित झाल्यानंतर फादर परेरा यांच्या विरोधात कुंकळ्ळी, काणकोण, कुडचडे आदी पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी प्रविष्ट झाल्या होत्या. संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर फादर परेरा यांनी सार्वजनिकरित्या क्षमा मागितली होती. फादर परेरा यांना कह्यात घेण्याच्या मागणीवरून शिवप्रेमींनी वास्को पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन छेडले होते. यानंतर पोलिसांनी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी फादर परेरा यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला. या वेळी फादर परेरा यांना मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. अन्वेषणाला सहकार्य केल्यास फादर परेरा यांना कह्यात घेण्याची आवश्यकता नसल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते. न्यायालयाने २० सहस्र रुपयांची वैयक्तिक हमी आणि तेवढ्याच किमतीचा हमीदार या अटींवर सशर्त जामीन संमत केला होता. फादर परेरा यांनी आता गुन्हा रहित करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाचे न्या. महेश सोनक आणि न्या. भारत देशपांडे या द्विसदस्यीय खंडपिठासमोर प्रविष्ट केली आहे.
संपादकीय भूमिकागुन्हा रहित केल्याने ‘गुन्हा झालाच नाही’, असा अर्थ होणार. त्यामुळे ‘ख्रिस्ती धर्मियांनी हिंदु धर्मातील श्रद्धास्थानांचा अवमान कधी केला नाही’, असा कांगावा करायला ख्रिस्ती मोकळे होणार ! |