मुंबई येथे ‘एन्काऊंटर’च्या नावाखाली काही पोलीस अधिकारी गुन्हेगारांना ठार करत काही कोटी रुपयांची कमाई करत होते !
माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांचा धक्कादायक खुलासा !
(‘एन्काऊंटर’ म्हणजे गुन्हेगारांशी सामना करून त्यांना ठार करणे)
मुंबई – मुंबई पोलिसांमध्ये काही असे पोलीस अधिकारी होते, जे ‘एन्काऊंटर’च्या नावाखाली थंड डोक्याने गुन्हेगारांना ठार करत. ते १ मासाला कोट्यवधी रुपयांची कमाई करत होते. गुन्हेगारांना ठार करण्यासाठी या पोलीस अधिकार्यांवर राजकीय दबाव टाकला जात असे, असा धक्कादायक खुलासा माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केला आहे. ३० ऑक्टोबर या दिवशी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे खुलासे केले आहेत.
मीरा बोरवणकर पुढे म्हणाल्या की, मुंबई पोलीस दलात ‘जॉईंट सीपी क्राइम’ या पदावर माझी नियुक्ती करण्यात आली होती. त्या वेळी माझ्यावर ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ अधिकार्यांना नियंत्रणात आणण्याचे दायित्व होते. मला अल्प कालावधीत एन्काऊंटर करणे पसंत नव्हते; पण यामुळे मी माझे १ मासाची १ कोटी रुपयांची हानी करून घेत आहे, असे त्या वेळी २ महत्त्वाच्या अधिकार्यांनी मला सांगितले होते; पण मला त्याने काही फरक पडला नाही, कारण पैसा कमावणे हे माझे ध्येयच नव्हते. काही अधिकारी ‘एन्काऊंटर’चे समर्थन करतांना सांगत होते की, आम्ही संबंधित गुन्हेगारांचा एन्काऊंटर केला नाही, तर ते गुन्हेगार इतर काही लोकांना ठार करतील. तेव्हा त्यांचे सूत्र मला पटत होते.
संपादकीय भूमिका
|