बाँबे रुग्णालयातील आरोपीकडून भ्रमणभाष आणि टॅब जप्त !
मुंबई – येथील बाँबे रुग्णालयामध्ये पोलिसांनी कॉक्स अँड किंग्सचा प्रवर्तक अजय अजित पीटर केरकर याचा भ्रमणभाष आणि टॅब दोन्हीही जप्त केले असून आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याला ईडीने अटक केली होती. वर्ष २०२० मध्ये आर्थर रोड कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली; परंतु त्याच्या प्रकृतीमुळे त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गेल्या साडेचार मासांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते. तो तेथे भ्रमणभाष आणि टॅब वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी वरील कारवाई केली.
संपादकीय भूमिकारुग्णालयामध्ये आरोपीपर्यंत वैयक्तिक साहित्य पोचतेच कसे ? |