New York Mayor Eric Adams : शिखांची पगडी म्हणजे आतंकवाद नव्हे !
न्यूयॉर्कमध्ये शिखांवर वाढलेल्या आक्रमणांवरून महापौर एरिक अॅडम्स यांचे वक्तव्य !
न्यूयॉर्क (अमेरिका) – न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी ‘शिखांवर होत असलेल्या आक्रमणांमुळे देशाची प्रतिमा डागाळली आहे’, असे वक्तव्य केले आहे. अॅडम्स म्हणाले की, शिखांची पगडी म्हणजे आतंकवाद नाही, तर ती विश्वासाचे प्रतीक आहे. पगडीचा अर्थ हा कुटुंब, समुदाय, शहर अशा प्रकारे आपण एकत्र येणे होय. शीख समुदायाचे रक्षण केले पाहिजे आणि शीख धर्माविषयी जागरूक होण्याची आवश्यकता आहे.
शिखांनी आयोजित एका कार्यक्रमात अॅडम्स पुढे म्हणाले की, तुम्ही आतंकवादी नसून रक्षक आहात. संपूर्ण शहराला हे सांगण्याची आवश्यकता आहे. शहरातील शिखांवर होत असलेल्या आक्रमणांत इतक्यात वाढ झाली आहे. १५ ऑक्टोबर या दिवशी शहरातील रिचमंड हिलमध्ये असलेल्या गुरुद्वारात जात असतांना एका १९ वर्षीय शीख मुलावर आक्रमण करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी ६६ वर्षीय जसमेर सिंह यांच्या चारचाकी वाहनाने दुसर्या वाहनाला धडक मारली. उपचारांच्या वेळी त्यांचा मृत्यू झाला होता.