फिजा जहां हिची घरवापसी; अंकित वाल्मीकि याच्याशी केला विवाह !
सनातन धर्मावर पूर्ण श्रद्धा असल्याचे फिजा हिचे प्रतिपादन
मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथील फिजा जहां या मुसलमान युवतीने अंकित वल्मीकि नावाच्या हिंदु युवकाशी विवाह केला आहे. यासाठी आधी तिने स्वत:चे शुद्धीकरण करण्याची इच्छा व्यक्त केली. हिंदु धर्म स्वीकारल्यानंतर नोएडा येथील आर्य समाज मंदिरात दोघांनी हिंदु पद्धतीनुसार विवाह केला. तिचे चाहत वल्मीकि असे नामकरण करण्यात आले. या वेळी तिने ‘सनातन धर्मावर माझी पूर्ण श्रद्धा आहे’, असे सांगितले. हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या सदस्यांनी या दोघांच्या विवाहाला उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद दिले.
फिजा जहां ही गेल्या ४ वर्षांपासून अंकितवर प्रेम करत होती; परंतु तिच्या कुटुंबियांचा त्यांच्या विवाहाला विरोध होता. अबरार हुसेन असे तिच्या वडिलांचे नाव आहे. एके दिवशी तिने घरच्यांच्या अनुपस्थितीत पळ काढला. अंकितसह तिने नोएडा गाठले. येथे दोघे आर्य समाज मंदिरात गेले. पुजार्याकडे त्यांनी विवाहाची इच्छा व्यक्त केली. दोघांचे वय १८ वर्षांहून अधिक असल्याचे कागदपत्रांतून स्पष्ट झाल्यानंतर त्यांचा विवाह लावण्यात आला.
संपादकीय भूमिकालव्ह जिहादला थोतांड म्हणणारे, तसेच त्याच्या विरोधात कार्य करणार्या हिंदुत्वनिष्ठांवर आगपाखड करणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी आता अशा प्रसंगांना विरोध करू लागल्यास आश्चर्य वाटू नये ! |