वीर सावरकर उवाच
अलेक्झांडर हा पराक्रमी होता, विजेता होता; पण जगज्जेता नव्हता ! भारत विजेता तर तो नव्हताच नव्हता ! आता जिंकण्यास जगात देश उरला नाही, अशा जाणिवेने त्याला रडू कोसळणे अशक्य होते. त्याला रडू कोसळले ते ज्या भारताचा मी सम्राट होऊ इच्छित होतो, त्या अखिल भारताला मी मरेपर्यंत जिंकू शकलो नाही म्हणून !
(साभार : ‘सहा सोनेरी पाने’ ग्रंथ, ‘सोनेरी पान पहिले : अलेक्झांडर हा जगज्जेता तर नव्हताच; पण तो भारतविजेता ही नव्हताच’)