हाजीपूर (बिहार) मध्ये ‘सनातन सात्त्विक स्टोअर’चा शुभारंभ
हाजीपूर (बिहार) – येथील श्री. सुजीत सोनी यांनी नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर ‘सनातन सात्त्विक स्टाअेर’ नावाने सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे दालन उघडले आहे. श्री. सोनी यांचे आभूषणांचे दुकान आहे. त्यांच्या दुकानामध्ये असलेल्या मोकळ्या जागेत त्यांनी या उत्पादनांची विक्री चालू केली आहे. श्री. सोनी मागील ८ वर्षांपासून सनातनची सात्त्विक उत्पादने वापरतात. त्यांना ही उत्पादने ७ किलोमीटर लांब असलेल्या सोनपूर येथून आणावी लागत होती. आता त्यांनी या सात्त्विक उत्पादनांचा स्वत:सह समाजालाही लाभ व्हावा, या उद्देशाने हे दुकान चालू केले आहे.