‘आयुर्वेद महोत्सवा’त दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीचा सत्कार ! 

‘आयुर्वेद महोत्सवा’त सत्कार करतांना डावीकडून श्री. प्रदीप भिडे, श्री. अजय केळकर, श्री. शशिकांत कुलकर्णी आणि डॉ. अभिजित डुबल (उजवीकडे)

कोल्हापूर – कमला महाविद्यालयाजवळील ‘व्ही.टी. पाटील हॉल’ येथे ‘आयुर्वेदिक रिसेलर्स असोसिएशन’च्या वतीने २७ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत ‘आयुर्वेद महोत्सव’ पार पडला. या महोत्सवात दैनिक ‘सनातन प्रभात’ने महोत्सवाच्या विविध सत्रांचे चांगल्या प्रकारे वृत्तांकन केल्याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. अजय केळकर यांचा ‘असोसिएशन’च्या वतीने गौरवचिन्ह आणि तुळशीचे रोप देऊन सत्कार केला. या प्रसंगी आयोजक श्री. प्रदीप भिडे, श्री. शशिकांत कुलकर्णी, डॉ. अभिजित डुबल उपस्थित होते.