गुरूंचा संकल्प कार्यप्रवण करण्या अवतार श्रीसत्शक्तीचा झाला ।
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी हिंदु राष्ट्राचा संकल्प केला ।
संकल्प कार्यप्रवण करण्या
श्रीसत्शक्तीने अवतार घेतला ।। १ ।।
हे शिवधनुष्य घेऊन जाण्या ती सतत कार्यरत रहाते ।
हिंदु राष्ट्र निर्मितीचे एकच लक्ष्य
तिच्या डोळ्यांसमोर असते ।। २ ।।
गुरूंचा संकल्प आणि चैतन्य यांच्या बळावर साधकांना घडवते ।
भावसत्संगातील चैतन्यमय झर्यातून
ती भावामृतच सर्वांना देते ।। ३ ।।
सर्वांचे दुःख, चिंता दूर होते तिच्या केवळ संकल्पाने ।
व्यष्टी-समष्टी साधनेची घडी बसते आईच्या कृपेने ।। ४ ।।
श्रीगुरुराया आम्हाला तू दिला हा अनमोल मोती ।
साधनापथावर चालण्या देतो तो आम्हाला शक्ती ।।
कृतज्ञ आम्ही सारे जीव तव चरणा ।
श्रीगुरुराया केवळ तव चरणा ।। ५।।
टीप : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
– श्री. अविनाश जाधव (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |