उमरखेड (यवतमाळ) येथे मध्यरात्री अज्ञातांनी एस्.टी. बस जाळली !
उमरखेड (यवतमाळ), २९ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील नागपूर-तुळजापूर महामार्गावर गोजेगाव येथील १० ते १२ अज्ञात तरुणांनी एस्.टी. बसच्या काचा फोडून ती जाळली. हे तरुण दुचाकीवरून आले होते. ही घटना २७ ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली. बसमधील ७२ प्रवाशांना खाली उतरवून ही बस जाळण्यात आली. यात ३२ लाख रुपयांची हानी झाली आहे. मराठा आरक्षणाशी या घटनेचा संबंध जोडला जात आहे. (राष्ट्रीय संपत्तीची हानी करणार्यांकडूनच हे पैसे वसूल करायला हवेत ! – संपादक)