जे अधर्माचे आचरण करून इतरांची हानी करत आहेत, ते नष्ट होणार आहेत !
मानवतेविषयी जागतिक दृष्टी असलेला एकमेव सनातन धर्म !
सनातन धर्मावर आतून आणि बाहेरून होणार्या आक्रमणांचे मूळ हिंदु धर्माविषयी असलेला तिरस्कार अन् शिवाचे वैश्विक नृत्य जे जगाच्या अस्तित्वाचे सार आहे ते थांबवू न शकणे यांमध्ये आहे. त्यामुळे धर्मांधांच्या युतीच्या रणनीतीविषयी समाजामध्ये जागृती करणे, हे आमचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. एकेश्वर वादावर आधारित असलेले धर्माेपदेशक आणि साम्यवादी यांचा सामाजिक त्रुटी दाखवून स्वार्थी राजकीय हेतूने दुसर्या धर्माला बाजूला करणे, हा हेतू आहे. याउलट सनातन धर्म अनंत आणि वैश्विक सत्य असून आपल्या अस्तित्वाच्या पलीकडील जाणीव, बुद्धीमत्ता अन् स्वतःविषयीची जाणीव यांविषयी माहिती देणारा आहे. आपण माणूस म्हणून आपल्या आत असलेल्या त्या सर्वाेच्च सत्याशी जाडलेलो असून आपल्याला त्याविषयीची जाणीव मर्यादित स्वरूपात आहे; कारण आपण स्वतःचे स्वरूप ओळखण्यासाठी क्वचितच खोलवर जाऊन विचार करतो. सनातन धर्म या नावाची ओळख, विश्वास, तत्त्वज्ञान किंवा संस्था यांच्या पलीकडे आहे. तो सूर्यप्रकाशाप्रमाणे अंतर्निहित आणि स्वयंसिद्ध आहे. ही वैश्विक दृष्टी लक्षात घेता सत्याविषयीचा वैदिक विचार, म्हणजे ते अपौरूषेय अर्थात् व्यक्ती, स्थळ आणि काळ यांच्या मर्यादेच्या पलीकडे आहे.
१. जीवनातील कोणतीही गोष्ट ही धर्म आणि योग यांद्वारे साधण्यासाठीच !
भारताला ‘धार्मिक संस्कृती’ या नावाने चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. भारताची सांस्कृतिक ओळख, सत्याविषयीचा दृष्टीकोन, सत्यता, जीवन आणि पवित्र धार्मिक परंपरा पहाता ‘धर्म’ हा शब्द महत्त्वाचा आहे. ‘धर्म’ हा शब्द भारतातील आध्यात्मिक शिकवणीला, म्हणजेच सर्वांत जुन्या आणि प्राचीन असलेल्या वैदिक साहित्यातील शिकवणीला उद्देशून आहे. यामध्ये आज जगभर पसरलेले वेद आणि योग यांविषयीचे तत्त्वज्ञान आहे. याखेरीज भारतातील कला, स्थापत्यशास्त्र, संगीत, नृत्य, काव्य, औषधी (आयुर्वेद), गणित, विज्ञान, खगोलशास्त्र, विश्वउत्पत्तीशास्त्र, जगातील सभ्यता आणि जीवन जगण्याची पद्धत यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. जीवनातील कोणतीही गोष्ट ही धर्मानुसार आणि योगाद्वारे साधण्याचा मार्ग आहे.
२. धार्मिक दृष्टीकोनांतून हिंदूंची धर्माविषयी धारणा
हिंदु धार्मिक दृष्टीकोनांचे हिंदु परंपरांमध्ये अनेक प्रकारे प्रकटीकरण झालेले आहे. यामध्ये शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य, सौर आणि वैश्विक बुद्धी, स्थळ अन् काळ यांनुसार त्यामध्ये झालेले पालट यांचा समावेश आहे. या धार्मिक दृष्टीकोनावर भारतातील अनेक गुरूंनी प्रकाश टाकला असून त्यांनी याविषयी शिष्याला आतूनच ज्ञान दिले. उदाहरणार्थ स्वामी विवेकानंद यांना १३० वर्षांपूर्वी अशा प्रकारे ज्ञान प्राप्त झाले. चीन, जपान आणि तिबेट या देशांसह संपूर्ण आशियामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला. बौद्ध धर्मामध्ये केवळ मठ परंपरा वगैरे नसून संपूर्ण संस्कृती, मानसशास्त्र आणि विश्वउत्पत्तीशास्त्र यांविषयीची वैश्विक धार्मिक तत्त्वे अन् पद्धती आहेत. जैन धर्माची स्थापत्यशास्त्र, गणित, तत्त्वज्ञान, सामाजिक मूल्ये ही वैशिष्ट्ये असून तो भारतात टिकून आहे. शीख धर्माच्या परंपरेमध्ये कर्म, पुनर्जन्म, मुक्ती यांसारख्या संकल्पना असून नामस्मरण, मंदिरे आणि यात्रा यांसारख्या पद्धती आहेत.
सध्याच्या भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्व धार्मिक परंपरांना मान देऊन त्या ते पुनरुज्जीवित करत आहेत. या धार्मिक परंपरांनी त्यातील मूल्ये, पद्धत, संस्कृती यांनी अनेक देशांशी भागीदारी केली आहे; परंतु ‘स्वतःच्या धर्माचे तत्त्वज्ञान श्रेष्ठ आहे’, असे धरून आपल्या श्रद्धेप्रमाणे जग जिंकणे किंवा जगातील लोकांचे धर्मांतर करणे, या दृष्टीने हिंदूंनी कोणत्याही देशावर आक्रमण केलेले नाही. ‘सर्व जीवन हे पवित्र आहे आणि स्वत्वाची जाणीव ही सर्व जगात व्यापलेली असून मानवतेच्या दृष्टीने सर्व जग हे एक कुटुंब आहे’, अशी हिंदूंची धारणा आहे. या सर्व परंपरा आपल्याला जीवनाच्या लयीविषयी ग्रहणक्षमता आणि आदरयुक्त जाणीव ठेवण्याविषयी सांगतात अन् आपल्याला मानववंशीय आणि मानवकेंद्रीत विचार, तसेच कृती यांवरच केंद्रित न ठेवता त्याच्या पलीकडे नेतात.
३. हिंदु धर्म विविधता, सृजनता आणि नवीन संकल्पना यांना मान्यता देणारा !
हिंदु धार्मिक परंपरांनी त्यांची मूल्ये, पद्धती आणि संस्कृती अनेक देशांना दिली आहे; परंतु कुठल्याही देशावर आक्रमण केले किंवा आपल्या श्रद्धेप्रमाणे कुणालाही हिंदु धर्मामध्ये वळवले किंवा त्यांना (अन्य धर्मियांना) जिंकण्याचा प्रयत्न केला, असे काही केले नाही. ‘सर्व जीवन हे पवित्र आहे’, असे म्हणून या धार्मिक परंपरा अन्यांना आपलेसे करतात आणि ‘सर्व जग हे मानवतेने व्याप्त असून सर्व एक कुटुंब आहे’, या जाणिवेने जगाकडे पहातात. या धार्मिक परंपरा आम्हाला ग्रहणक्षम, आदराची जाणीव आणि जीवनाचा ताल धरून विकसित करण्यास सांगतात. त्या आम्हाला मानवकेंद्रित विचार आणि कृती यांच्या पलीकडे नेतात. याचा अर्थ असा नव्हे की, हिंदु धार्मिक परंपरा समान आहेत, असे होत नाही. हिंदु धर्म हा विविधता, सृजनता, स्वीकारार्हता यांचे स्वागत करतो आणि नवीन संकल्पना, चर्चा अन् अभिव्यक्ती यांचे स्वातंत्र्य देतो. त्याची व्याख्या, म्हणजे तो अंतर्गत साधना आणि अनुभव यांच्यावर आधारित असून त्यामुळे वैयक्तिक पातळीवर थेट ज्ञान होते. हिंदु धर्म हा आध्यात्मिक दृष्टीकोनावर आधारीत असून बाह्य गोष्टींवर नाही. तरीही अद्वैतासारख्या जागतिक आणि अनादी सत्याला जाणून घेतांना या धार्मिक परंपरा पालटणारा काळ, स्थळ, व्यक्ती अन् कर्म यांनुसार त्यांच्यामध्ये पालट करण्यालाही महत्त्व देतात.
४. सनातन धर्माचा अर्थ आणि त्याचे स्वरूप
या चिरकाल टिकणार्या परंपरा, म्हणजे सनातन धर्म ! हे त्या धर्माला उद्देशून आहे की, जो अनंत, शाश्वत, सर्वदा जुळवून घेणारा आहे. सनातन धर्मामध्ये धर्माचे सर्व पैलू, नैसर्गिक नियम आणि वैश्विक बुद्धीमत्तेमध्ये असलेली शक्ती अन् जीवनातील सर्व पैलू, विविध स्तर यांमधील सुसंवाद साधणार्या कृती यांचा समावेश आहे. तो केवळ एक सूत्र, संकेतांक, पंथ नाही, तर जीवनाचे चिरकाल सत्य आणि जाणीव या एकेमकांवर अवलंबून आहे अन् शेवटी ‘हे सर्व एकच आहेत’, हे सांगतो. तो प्रत्येक पिढीतील थोर ऋषी, योगी जे आपल्याला मिळालेले ज्ञान त्यांच्यावर विश्वास ठेवणार्यांना देतात, त्यांच्या अनुभवावर आधारित आहे.
भारताची सभ्यता आणि तिचा जगावर असलेला प्रभाव हे जाणून घेण्यासाठी एखाद्याला धर्म अन् त्याचे सनातन स्वरूप, म्हणजे ज्याचे नवीन नाव आणि साचा यांनुसार नूतन होण्याची क्षमता आहे, तसेच त्यांची श्रेष्ठता अन् चिरकाल टिकणारी तत्त्वे टिकवून ठेवणारा आहे. बाह्य जगातील राजकीय विचारांवर आधारित आधुनिक लोक यांना हिंदु धर्माविषयी योग्य ज्ञान नाही किंवा त्याची ओळख नाही. त्यामुळे त्यांचे पालटणारे विचार ते जागतिक तत्त्वांची जाणीव न ठेवता इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतात. त्यांना सनातन धर्माच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.
सनातन धर्म हा स्वतःच्या जाणिवेविषयीच्या विविध शक्ती आणि जाणीव यांचा आरसा असून आपल्या मानव जातीवरील वर्चस्वावर अवलंबून नाही. बाह्यतः तो नष्ट करणे, कह्यात घेणे किंवा नियंत्रित करणे शक्य नाही; कारण त्याची मुळे बाह्य स्वरूपामध्ये नसून आपल्यामध्ये, तसेच सर्वत्र आहेत. तरीही हे जागतिक सत्य जाणून घेण्यास आपण अपयशी ठरतो. त्याऐवजी आपण आपल्या वैयक्तिक पूर्वग्रहानुसार फूट पाडणार्या शक्तींचे अनुयायी होतो. यामुळे आपण स्वतःसाठी आणि जगासाठी नकारात्मक कर्मे निर्माण करतो. आम्ही जर धर्म जाणून घेण्यास अपयशी ठरलो, तर आपले स्वतःचे जीवन आणि जाणीव यांवर वाईट परिणाम होऊन आपण नियंत्रित करत असलेल्या सभोवतालच्या जगावर त्याचा परिणाम होतो. सनातन धर्म हा नाम आणि आकार या पलीकडे असलेले जग अन् त्याचा पाया यांच्याशी एकरूप झालेला आहे. त्याला मान न देणे, म्हणजे आपल्यामधील स्वतःचे अस्तित्व नाकारण्यासारखा हास्यास्पद प्रकार आहे. हिंदु धर्म नाकारणे, म्हणजे स्वतःमधील एकात्मता, संस्कृती आणि सर्वांशी असलेले संबंध नष्ट करण्यासारखे आहे.
५. सनातन धर्मासमोरील आव्हाने !
भारतातील साम्यवादी, द्रविडियन, राष्ट्रवादी किंवा घराणेशाहीवर आधारित काँग्रेस पक्ष हे भारताकडे केवळ सत्ता मिळवणे किंवा बाह्यतः स्वतःचे नियंत्रण असावे, या दृष्टीने पहात आहेत. ते धर्माला मान देत नाहीत आणि त्यांचे काही नेते आता ‘सनातन धर्म नष्ट केला पाहिजे’, अशी भाषा करत आहेत. ‘सर्व जगाने त्यांच्यासमोर झुकावे’, या त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी सनातन धर्माविषयी प्रश्न उपस्थित करत आहेत. तमिळनाडूचे युवाकल्याण आणि क्रीडाविकास मंत्री उदयनिधी स्टॅलीन यांनी वक्तव्य केले, ‘‘काही गोष्टींचा नुसता विरोध न करता त्या गोष्टी पूर्णपणे नष्ट केल्या पाहिजेत. आपण डेंग्यू, मलेरिया किंवा कोरोना महामारी यांना विरोध न करता त्यांना समूळ नष्ट केले पाहिजे. त्याचप्रमाणे आपण सनातनला नष्ट केले पाहिजे.’’ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वक्तव्य केले आहे, ‘‘खासदार हे मंदिरातील मूर्तींप्रमाणे झाले आहेत. संसदेत इतर मागासवर्गीय खासदारांची पदे मूर्तींप्रमाणे भरली जात आहेत. त्यांना कोणताही अधिकार नसतो किंवा देश चालवण्यामध्ये त्यांचे काहीही योगदान नसते.’’ समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे, ‘‘मला रामचरितमानसविषयी काहीही प्रश्न नाहीत; परंतु त्यामधील काही भागांमध्ये समाजातील विशिष्ट जात किंवा जमात यांविषयी असलेली अपमानास्पद टीका काढली पाहिजे.’’
अगदी अलीकडच्या सतत पालटत असलेल्या आणि वादग्रस्त सामाजिक विचारांनुसार केवळ सनातन धर्माविषयी सुसंवाद असणे, म्हणजे राजकीय दृष्टीने योग्य असणे, असे नाही. आता आपल्यामधील जग, म्हणजे स्वतःचे खरे स्वरूप, कुटुंबीय आणि सर्वकाळ एकात्मता यांची ओळख झाली पाहिजे. सनातन धर्म हा हिमालयाप्रमाणे विशाल असून थोर योगी, ऋषि आणि गुरु की, जे त्याचे प्राचीन काळापासून अनुकरण करत आहेत. ‘फूट पाडून सत्ता गाजवा’, यांसारखा स्वतःचा स्वार्थ साधण्याऐवजी तो आपल्याला एकत्वाच्या उच्च ध्येयाकडे नेतो. ‘सनातन धर्माला काढणे, म्हणजे आपल्यापासून पृथ्वी आणि आकाश काढून घेण्यासारखे आहे. पृथ्वी नाही, म्हणजे आपल्याला काही आधार नाही आणि आकाश नाही, म्हणजे विस्तार करून उन्नती साधण्यासाठी आपल्याकडे काही साधन नाही.’
सनातन धर्माचे रक्षण केले पाहिजे; कारण तो आपले चुकीच्या आणि विनाशक कृतींपासून रक्षण करतो. धर्म आपले रक्षण करतो, तर अधर्म आपल्याला विघटनाकडे नेतो. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण धर्म सांगत असलेल्या जागतिक दृष्टीला मान दिला पाहिजे. सनातन धर्म हा टिकून रहाणार आहे; परंतु जे त्याचे विचार आणि कृती यांमधून अधर्माचे आचरण करत इतरांची हानी करत आहेत, ते नष्ट होणार आहेत.
लेखक : डॉ. डेव्हिड फ्रॉले, निर्देशक, इन्स्टिट्यूट ऑफ वैदिक स्टडीज, अमेरिका.
(डॉ. डेव्हिड फ्रॉले यांच्या ‘फेसबुक’वरून साभार)
जो सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा करतो तो स्वतःच नष्ट होतो !
मोगल, ख्रिस्ती मिशनरी आणि ब्रिटीश सनातन धर्माला नष्ट करू शकले नाहीत, त्या सनातन धर्माला नष्ट करण्याचे दिवास्वप्न काही राजकारणी पहात आहेत. तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलीन यांनी केलेल्या वक्तव्याची भाषा आणि त्यामागील हेतू यांमुळे मला आश्चर्य वाटले. अशा प्रकारच्या धमक्यांचे परिणाम गंभीर होऊ शकतात. मुसलमान, मिशनरी आणि ब्रिटीश यांच्या आव्हानांचा सामना करूनही सनातन धर्माचा विजय झाला. मोगल आणि ब्रिटीश यांची सत्ता गेली. लक्षात ठेवा, ‘जो सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा करतो तो स्वतःच नष्ट होतो !’
– ज्येष्ठ अधिवक्ता अलोक कुमार, केंद्रीय कार्याध्यक्ष, विश्व हिंदु परिषद.