केरळमधील बाँबस्फोटांनंतर उत्तरप्रदेशमध्ये सतर्कतेची चेतावणी
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – केरळमध्ये ख्रिस्त्यांच्या प्रार्थनास्थळी झालेल्या बाँबस्फोटांनंतर उत्तरप्रदेशमध्ये सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. विशेष पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितले की, इस्रायल आणि हमास यांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच सतर्कतेची चेतावणी देण्यात आलेली आहे. केरळच्या घटनेनंतर अधिक माहिती घेतली जात आहे. इस्रायलच्या विरोधातील आंदोलनावरही लक्ष ठेवले जात आहे. आम्ही केरळ पोलीस आणि अन्य गुप्तचर यंत्रणा यांच्या संपर्कात आहोत.
उत्तरप्रदेशमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया, वहदत-ए-इस्लामी आदी जिहादी संघटनांच्या संशयितांचा शोध घेतला जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने लक्ष्मणपुरी, भदोही, संतकबीरनगर, बलिया आदी ७ जिल्ह्यांत या संघटनांच्या ठिकाणांवर धाडी घातल्या होत्या.