इस्रायलच्या आक्रमणात आतापर्यंत ३३ मशिदी उद्ध्वस्त !
हमासच्या आतंकवाद्यांकडूनरॉकेट डागण्यासाठी आणि लपण्यासाठी केला जात होता मशिदींचा वापर !
तेल अविव (इस्रायल) – इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला २३ दिवस झाले आहेत. इस्रायलकडून सातत्याने गाझा पट्टीवर आक्रमणे केली जात आहेत. या आक्रमणात आतापर्यंत ३३ मशिदी नष्ट केल्या आहेत. या मशिदींमध्ये हमासच्या आतंकवाद्यांची ठिकाणे होती. या मशिदींचा वापर कारवाया करण्यासाठी केला जात होता. अशाच प्रकारचा वापर गाझातील प्रसिद्ध ‘अल् शिफा’ या रुग्णालयाचाही केला जात आहे. सध्या या रुग्णालयात मोठ्या संख्येने विस्थापितांनी आश्रय घेतला आहे.
Israel’s attacks so far have razed 33 Mosques to the ground!
HOW WERE THEY USED ?
These were used by #Hamasterrorists to hide weapons and fire rockets.PONDER!
👉 Gaza’s M@$j!ds have appeared to be the base camps for #terrorists. India should investigate if such a misuse is… pic.twitter.com/In3aUzdABJ— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 29, 2023
गाझातील अल् इहसान मशीद, हतिन मशीद या सर्व अन्य काही प्रसिद्ध मशिदी नष्ट झाल्या आहेत. हमासचे आतंकवादी या मशिदींचा वापर रॉकेट डागण्यासाठी आणि लपवण्यासाठी करत होते. इस्रायलने गाझा पट्टीतील कुराण रेडियो केंद्राचे मुख्यालयही उद्ध्वस्त केले आहे.
संपादकीय भूमिका‘गाझातील मशिदी, म्हणजे जिहादी आतंकवाद्यांचे तळ’ असेच आता म्हणावे लागेल ! असे भारतात कुठे होत असेल, तर त्याचा शोध घेतला पाहिजे ! |