Gulfasha Akash : घरवापसी केलेल्या मुसलमान तरुणीशी विवाह केल्याने हिंदु युवकाच्या जीविताला धोका !
युवतीच्या कुटुंबियांकडून हिंदु युवक आणि त्याचे कुटुंबीय यांना जिवे मारण्याची धमकी
देहली – येथील गुल्फशा नावाच्या एका मुसलमान युवतीने घरवापसी करून तिच्या आकाश नावाच्या हिंदु प्रियकराशी जुलै २०२३ मध्ये विवाह केला होता. ‘स्नेहा’ नाव धारण केलेली स्नेहा आणि तिचा पती आकाश राजपूत यांनी सांगितले की, स्नेहाच्या मुसलमान कुटुंबियांनी आकाशला ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे या स्नेहा आणि आकाश यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट करून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. आकाशने सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवूनही पुढील कोणतीच कारवाई केलेली नाही. (संबंधित अधिकार्यांवर त्यांच्या वरिष्ठांनी कारवाई करायला हवी ! – संपादक) हे प्रकरण देहलीतील सुल्तानपुरी क्षेत्रातील आहे.
१. दोघांनी राजस्थानच्या कोटा येथे जाऊन विवाह केला होता.
२. आकाश राजपूत यांनी या प्रकरणी नुकतेच एक पत्र प्रसारित करून सांगितले की, माझे आणि स्नेहाचे (पूर्वाश्रमीच्या गुल्फशाचे) ३ वर्षांपासून प्रेम असून आमचे वैवाहिक जीवन सुखी आहे. मी स्नेहाची सुटका केली नाही, तर मला अन् माझ्या कुटुंबियांना जिवे मारण्याच्या धमक्या मला दिल्या जात आहेत.
३. स्नेहाने पोलिसांकडे तक्रार नोंदवत असतांना सांगितले की, तिचे वडील तिच्याकडे वाईट दृष्टीने पहात असत. (ही आहे धर्मांधांची वासनांध मानसिकता ! – संपादक)
४. आकाश याने सांगितले की, स्नेहाची आई नसरीन हिने ‘आकाशने तिच्यावर बलात्कार केला’, अशी खोटी तक्रार प्रविष्ट केली आहे. याउलट स्नेहा हिने ‘हिंदु धर्म स्वीकारल्याने मी पुष्कळ आनंदी आहे’, असे सांगितले.
संपादकीय भूमिका‘प्रेम हे प्रेम असते’ आणि ‘प्रेमाला धर्माच्या बंधनात बांधू नये’, अशा प्रकारे हिंदूंना उपदेश करणारे पुरो(अधो)गामी अशा घटनांच्या वेळी कोणत्या बिळात जाऊन लपतात ? |