पंजाबमध्ये ४ खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक
मोठा शस्त्रसाठा जप्त
मोहाली (पंजाब) – येथे खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘बब्बर खालसा इंटरनेशनल’च्या ४ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या आतंकवाद्यांचा संबंध पाकिस्तानात लपलेला आतंकवादी हरविवंदर सिंह रिंदा याच्याशी आहे. रिंदा ‘बब्बर खालसा इंटरनेशनल’चा प्रमुख आहे. रिंदा आणि पकडण्यात आलेले आतंकवादी पाकिस्तानातून शस्त्रांची तस्करी करत होते. ड्रोनच्या माध्यमांतून पाकिस्तानातून शस्त्र मागवली जात होती. यानंतर ती ते पंजाबमध्ये पोचवत होते. पोलिसांनी पकडलेल्या शस्त्रसाठ्यामध्ये ६ विदेशी पिस्तुल आणि २७५ जिवंत काडतुसे यांचा समावेश आहे. हा शस्त्रसाठा कुणाला देण्यात येणार होता ?, याची चौकशी पोलीस करत आहेत.