स्पेनमध्ये गेल्या ८ दशकांत चर्चमध्ये ४ लाख मुलींचे लैंगिक शोषण !
माद्रिद (स्पेन) – स्पेनमध्ये वर्ष १९४० पासून आतापर्यंत रोमन कॅथॉलिक चर्चमध्ये २ लाखांपेक्षा अधिक अल्पवयीन आणि प्रौढ मुली पाद्य्रांकडून झालेल्या लैंगिक शोषणाच्या बळी ठरल्या आहेत, अशी माहिती एका अहवालात समोर आली. चर्चमधील सामान्य सदस्यांकडून ४ लाख मुली लैंगिक शोषणाच्या बळी पडल्याचीही माहिती यात देण्यात आली आहे. स्पेनचे राष्ट्रीय लोकपाल एंजल गॅबिलोंडो यांनी या अहवालात ही माहिती दिली आहे. या अहवालात पीडितांना भरपाई देण्यासाठी राष्ट्रीय निधी उभारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा अहवाल स्पेनच्या संसदेत सादर करण्यात आला आहे. मार्च २०२२ मध्ये स्पॅनिश संसदेने चर्चवरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती.
१. या शेषणाच्या संदर्भात एका आयोगाने ८ सहस्र लोकांकडून माहिती घेतली. त्यांतील ०.६ टक्के लोकांनी त्यांचे चर्चमध्ये लैंगिक शोषण झाल्याची स्वीकृती दिली. स्पेनची लोकसंख्या ३ कोटी ९० लाख असून त्यापैकी ०.६ टक्के, म्हणजे हे प्रमाण २ लाख लोक इतके होते.
२. लहानपणी चर्चमध्ये गेल्यावर पाद्य्रांनी त्यांचे शोषण केल्याचे अनेकांनी सांगितले. पाद्य्रांखेरीज अनेकांनी चर्चच्या इतर सदस्यांवरही आरोप केले. या सदस्यांनी केलेल्या शोषणाची टक्केवारी १.१३ टक्के, म्हणजे ४ लाख इतकी आहे.
३. वर्ष २०२० मधील काही तक्रारींवर आधारित तपासणीत लैंगिक शोषणाची ९२७ प्रकरणे उघडकीस आली आहेत. चर्चने म्हटले आहे की, लैंगिक शोषण रोखण्यासाठी बिशपच्या (वरिष्ठ पाद्य्राच्या) अधिकारातील प्रदेशात बाल संरक्षण कार्यालये स्थापन केली आहेत.
४. वर्ष २०१८ मध्ये, स्पेनच्या एका दैनिकाने केलेल्या अन्वेषणात वर्ष १९२७ मध्ये लैंगिक शोषणाच्या २ सहस्र २०६ प्रकरणांचा उलगडा झाला, ज्यामध्ये १ सहस्र ३६ आरोपींची ओळख पटली होती.
संपादकीय भूमिका‘चर्च म्हणजे लैंगिक शोषणाचे ठिकाण’ आणि ‘पाद्री म्हणजे वासनांध व्यक्ती’, अशी प्रतिमा कुणाच्या मनात निर्माण होत असेल, तर यात चुकीचे ते काय ? अशा घटनांच्या विरोधात जगभरातील ख्रिस्ती उघडपणे विरोध करतांना का दिसत नाहीत ? |