कर्नाटकातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ संतोष केंचांबा यांचे राष्ट्र-धर्म माध्यम’ फेसबुक पृष्ठ हॅक !
पृष्ठावर अश्लील छायाचित्रे आणि संदेश प्रसारित करून राष्ट्र-धर्म जागृती कार्याला कलंकित करण्याचा हिंदुविरोधकांचा प्रयत्न !
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि ‘राष्ट्र-धर्म माध्यमा’चे संस्थापक श्री. संतोष केंचांबा यांचे फेसबुक पान हॅक करण्यात आले आहे. गेल्या ८ वर्षांपासून या पानावरून राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांविषयीचा मजकूर प्रसारित केला जात होता. या पृष्ठाचे ३ लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. यामुळेच राष्ट्र आणि धर्म विरोधकांकडून हे पान हॅक केल्याचे म्हटले जात आहे. हे पान हॅक करून त्यावर अश्लील छायाचित्रे पोस्ट करण्यात आली आहेत.
या घटनेविषयी श्री. संतोष केंचांबा यांनी सांगितले की, विकृत मनःस्थितीचे जिहादी फेसबुकचे पान हॅक करून त्यात अश्लील आणि देश विरोधी संदेश घालत आहेत. मी कितीतरी वर्षांपासून या फेसबुक पानाद्वारे भारतीय संस्कृती, थोरामोठ्यांचे संदेश प्रत्येक घरी पोचवण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही हे पान अत्यंत जागरूकतेने चालवत असूनही जिहाद्यांनी ते हॅक केले आहे. आमचा तांत्रिक विभाग त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. आमचे फेसबुकचे पान इतक्या सहजतेने हॅक करता येते; म्हणजे फेसबुकची सुरक्षाव्यवस्था शोचनीय म्हणावी लागेल. यामुळे जो त्रास झाला, त्यासाठी मी सर्वांची क्षमा मागतो.