मराठी चित्रपटांच्या दुरवस्थेला मराठी प्रेक्षकच उत्तरदायी ! – गौरव मोरे, अभिनेता
मुंबई – मराठी चित्रपटांच्या दुरवस्थेला मराठी प्रेक्षकच उत्तरदायी आहेत. इतर प्रादेशिक भाषांमध्ये येणारे चित्रपट मात्र अधिक प्रसिद्ध होतात. तेथील स्थानिक कलावंतांना एका रात्रीत प्रसिद्धी मिळते; कारण त्या त्या भाषांतील लोक आपल्या भाषेतील चित्रपट आवर्जून पहातात; मात्र मराठी प्रेक्षक मराठी चित्रपट पहात नाहीत. याविषयी कलावंत म्हणून वाईट वाटते, असे विधान ‘हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील अभिनेता गौरव मोरे यांनी व्यक्त केली. एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले…
१. मराठी अभिनेते जेव्हा हिंदी किंवा इतर प्रादेशिक भाषांमध्ये दुय्यम भूमिका करतात, तेव्हा आपलेच प्रेक्षक त्यांच्यावर टीका करतात, हे अयोग्य आहे.
२. मराठी चित्रपटाला प्रेक्षक मिळत नाहीत, ही अतिशय दुःखदायक गोष्ट आहे. मराठी कलावंतांमध्ये अभिनयाची क्षमता अधिक आहे. मराठी प्रेक्षकांनी भाषेचा अभिमान बाळगून जाणीवपूर्वक चित्रपट पाहिले, तरच मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस येतील.”
संपादकीय भूमिकाकेवळ मराठी प्रेक्षकच नव्हे, तर सर्वच स्तरांवर होणारी मराठी भाषेची गळचेपी मराठीच्या दुरवस्थेला कारणीभूत आहे ! केवळ मराठी प्रेक्षकांवर खापर न फोडता मनोरंजन, तसेच कला विश्वातील किती मराठी अभिनेते आणि अभिनेत्री मराठीचा पुरस्कार करतात ? किंवा सर्रासपणे मराठी भाषा बोलतात ? हेसुद्धा पहायला हवे. |