शासकीय मान्यता न घेता शाळा चालू केल्याने नर्हे (पुणे) येथे संस्थाचालकावर गुन्हा नोंद !
पुणे – शासकीय मान्यता न घेता नर्हे परिसरात एका संस्थाचालकाने ‘आर्यन पब्लिक स्कूल’ ही शाळा चालू करून विद्यार्थी आणि पालक यांची फसवणूक केली आहे. ही घटना १६ जून २०२२ ते ११ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडली. या प्रकरणी अशोक श्रीरंग गोडसे यांनी संस्थाचालक चौरे यांच्यासह मुख्याध्यापिकेविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटींची तसेच कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता शाळा सुरू ठेवत विद्यार्थ्यांना अनधिकृतरीत्या प्रवेश देऊन पालकांकडून भरमसाठ शुल्क वसूल करून शासन, पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी नऱ्हे येथील प्रसिद्ध आर्यन पब्लिक स्कूल (Aryan… pic.twitter.com/ykAZ16tnvO
— Civicmirrorofficial (@civicmirrorpune) October 27, 2023
चौरे यांनी शाळा चालू केली; मात्र शासन मान्यता, तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नव्हती. विद्यार्थ्यांना शाळेत अवैधरित्या प्रवेश देत पालकांकडून मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक शुल्क वसूल केले. पालकांनी शाळेकडे कागदपत्रे आणि दाखला मागितल्यावर चौरे यांनी तो देण्यास नकार दिला.