देवाची ‘द’ ची बाराखडी
द- ‘दयेचा सागर असणारा देव
दा – दास होऊन भक्तांची सेवा करणारा
दि – दिवसरात्र भक्ताची काळजी घेऊन त्याचे रक्षण करणारा
दी – दीप भावाचा भक्ताच्या अंत:करणात सदैव तेवत ठेवणारा
दु – दुःख दूर करून भक्ताला आनंद प्रदान करणारा
दू – दूर असलेल्या भक्तावरही सतत मायेची पखरण घालणारा
दे – देवत्वाची अनुभूती देऊन भक्ताची श्रद्धा दृढ करणारा
दै – दैत्यांचे आणि दैत्यरूपी षड्रिपूंचे निर्मूलन करण्यास भक्ताला साहाय्य करणारा
दो – दोषरहित करून भक्ताला शांतीची अनुभूती देणारा
दौ – दौलत, कृपा, भाव आणि प्रेम यांची भक्तावर उधळण करणारा
दं – दांभिकतेपासून खर्या भक्ताला दूर ठेवणारा असा करुणाघन देव भक्ताच्या मनमंदिरात सदैव वास करतो.’
– श्रीमती रजनी साळुंके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.९.२०२३)