केरळमध्ये मुसलमान महिलांनी बुरखा न घातलेल्या हिंदु महिलेला बसमध्ये चढण्यास केला विरोध !
नवी देहली – केरळच्या सरकारी परिवहन खात्याच्या बसमध्ये बुरखा घातलेल्या काही मुसलमान महिलांनी एका साडी नेसलेल्या हिंदु महिलेला बसमध्ये चढण्यास विरोध केला. हिंदु महिलेने बुरखा न घातल्यामुळे या धर्मांध महिलांनी तिला विरोध केला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. ‘हा व्हिडिओ कोणत्या दिवशी चित्रित केला आहे आणि तो कोणत्या शहरातील आहे ?’, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. तथापि हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा काही वृत्त संकेतस्थळांकडून करण्यात येत आहे.
सौजन्य facto 1
हिंदूंना इस्लाम स्वीकारावा लागणार का ? – भाजप
भाजपचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी हा व्हिडिओ ‘एक्स’ या सामाजिक माध्यमाच्या खात्यावर शेअर करून म्हटले, ‘आता केरळमधील सार्वजनिक परिवहनाच्या बसमध्ये प्रवास करण्यासाठी हिंदूंना इस्लाम स्वीकारावा लागणार आहे का ? केरळच्या या सरकारी बसमध्ये मुसलमान महिला प्रवाशांचे म्हणणे आहे की, ज्या महिलांनी बुरखा घातला नाही, त्यांना बसमध्ये चढू देणार नाही.’
संपादकीय भूमिका
|