इस्लामी संघटनेने पॅलेस्टाईनला समर्थन देणार्या कार्यक्रमामधील पाहुण्यांच्या सूचीमधून शशी थरूर यांना वगळले !
काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी हमासच्या आक्रमणाला ‘आतंकवादी आक्रमण’ म्हटल्याचा परिणाम !
थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमधील ‘महल एम्पॉवरमेंट मिशन’ या इस्लामी संघटनेने काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना ३० ऑक्टोबर या दिवशी येथे पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामधील पाहुण्यांच्या सूचीतून हटवले आहे. खासदार थरूर यांनी २६ ऑक्टोबरला केरळच्या कोळ्ळीकोडमध्ये ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’ने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतांना हमासच्या आक्रमणाला ‘आतंकवादी घटना’ म्हटले होते. या विधानावरून थरूर यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले होते की, मी नेहमीच पॅलेस्टाईनच्या लोकांसमवेत आहे. माझ्या ३२ मिनिटांच्या भाषणातील मी २५ सेकंद जे बोललो, त्याच्याशी लोक सहमत नाहीत.
शशी थरूर म्हणाले होते की, युद्धात प्रतिदिन निरपराध लोक मारले जात आहेत. रुग्णालयांवर बाँबफेक होत आहे. मानवी हक्कांचे उघडपणे उल्लंघन होत आहे. मला एक गोष्ट सांगायची आहे. जेव्हा त्या (हमासच्या) आतंकवाद्यांनी नि:शस्त्र लोकांची हत्या केली, तेव्हा संपूर्ण जगाने त्याचा निषेध केला. आता सर्व जण इस्रायलच्या बाँबफेकीचा निषेध करत आहेत. दोन्ही बाजूंनी आतंकवादी आक्रमणेे झाली आहेत.
संपादकीय भूमिकासत्य बोलल्याचा काय परिणाम होतो, हे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या लक्षात आले असेल ! |