चोरी, दरोडे, बलात्कार आदी गुन्ह्यांमध्ये मुसलमान पहिल्या क्रमांकावर ! – खासदार बदरुद्दीन अजमल
|
(‘ए.आय.यु.डी.एफ्.ए.’ म्हणजे ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ आसाम’ – अखिल भारतीय आसामी लोकशाही आघाडी)
गौहत्ती (आसाम) – चोरी, दरोडा, बलात्कार आदी गुन्ह्यांमध्ये आपण (मुसलमान) पहिल्या क्रमांकावर आहोत. कारागृहात जाण्यातही आपण पहिल्या क्रमांकावर आहोत, असे विधान आसाममधील ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ आसाम’ पक्षाचे प्रमुख आणि खासदार मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी केले. २० ऑक्टोबर या दिवशी आसाममधील गोलपारा येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. या विधानावरून टीका होऊनही ते त्यावर ठाम आहेत. ‘मी काहीही चुकीचे बोललेलो नाही’, असे नंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले.
खासदार अजमल पुढे म्हणाले होते की,
१. मुसलमान मुलांना लोकांची फसवणूक करायला वेळ आहे !
आपल्या (मुसलमानांच्या) मुलांना शाळेत जायला वेळ नाही; पण जुगार खेळायला आणि लोकांची फसवणूक करायला भरपूर वेळ आहे. या सर्व चुकीच्या कृत्यांमध्ये कोण सहभागी आहे ?, तर मुसलमानांचा सहभाग आहे. ही खेदजनक गोष्ट आहे. (एका मुसलमान खासदाराला वाटते, ते निधर्मीवाद्यांना आतापर्यंत का वाटले नाही ? – संपादक)
२. कारागृहात मुसलमान बहुसंख्य !
लोक चंद्र आणि सूर्य यांच्याकडे जात आहेत आणि आपण (मुसलमान) कारागृहात जाऊन ‘पीएच् डी.’ करत आहोत. कोणत्याही पोलीस ठाण्यात जा, तुम्हाला दिसेल की, पूर्ण बहुमतात कोण आहे ? अब्दुर रहमान, अब्दुर रहीम, अब्दुर मजीद, बद्रुद्दीन, सिराजुद्दीन, फखरुद्दीन. हे दुःखदायक नाही का ?
टीका झाल्यानंतर अजमल यांनी दिलेले प्रत्युत्तर
१. जगभरातील मुसलमानांमध्ये शिक्षणाचा अभाव !
मी जगभरातील मुसलमान समुदायांमध्ये शिक्षणाचा अभाव असलेला पाहिला आहे. आपली (मुसलमानांची) मुले शिकत नाहीत, उच्च शिक्षण घेत नाहीत, मॅट्रिकही करत नाहीत, असे मी अनेकदा म्हटले आहे. तरुणांना शिक्षणाचे महत्त्व सांगण्यासाठी मी गुन्ह्यात मुसलमान पहिल्या क्रमांकावर असल्याचे म्हटले होते.
२. मुसलमानांमधून डॉक्टर किंवा अभियंते निर्माण होत नाहीत !
मुसलमान समाजाचा विकास न होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्यातील शिक्षणाचा अभाव. शिक्षणाविषयी आपण सरकारला दोष देतो; पण सरकारने आपल्याकडे डॉक्टर किंवा अभियंते मागितले, तर आपण ते देऊ शकत नाही. (उच्च शिक्षण घेणारे मुसलमानही गुन्हेगारी कृत्ये करतात, तसेच जिहादी आतंकवादी बनतात, याची असंख्य उदाहरणे आहेत, याविषयीही अजमल यांनी बोलायला हवे ! मुसलमानांमध्ये गुन्हेगारी कृत्ये करण्याची वृत्ती का निर्माण होते ?, याचा प्रामाणिकपणे विचार करण्याचे धाडस अजमल यांनी केले पाहिजे आणि ते जगाला सांगितले पाहिजे ! – संपादक) साक्षरतेचे प्रमाण वाढवायला हवे. त्यासाठी आपल्या तरुणांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करावे लागेल. शिक्षणाचा अभाव, हे सर्व वाईटांचे मूळ आहे. (यासाठी सर्वप्रथम मदरसे बंद करायला हवेत ! असे करण्याचे धाडस अजमल दाखवतील का ? – संपादक)
३. मुसलमानांनी परस्त्रीकडे पहातांना आई-बहिणींचा विचार करावा !
जी (मुसलमान) मुले महिलांना पाहून उत्तेजित होतात, त्यांना मी सांगू इच्छितो की, इस्लाममध्ये वागण्याचा योग्य मार्ग आहे. जेव्हा आपण बाजारात किंवा सार्वजनिक ठिकाणी असतो आणि आपण तेथे महिलेला पहातो, तेव्हा आपण दृष्टी फिरवून घ्यावी. मुलांनी लक्षात ठेवावे की, त्यांच्या घरातही स्त्रिया आहेत. त्यांनी स्वतःच्या आई-बहिणींचा विचार केला, तर त्यांच्या मनात कधीही चुकीचे विचार येणार नाहीत.
संपादकीय भूमिका
|