Tipu Sultan Sword : लिलावात मूळ रकमेतही कुणी विकत घेतली नाही क्रूरकर्मा टीपू सुलतानची तलवार !
लंडन (इंग्लंड) – म्हैसुरूचा क्रूरकर्मा राजा टिपू सुलतान याच्या एका तलवारीच्या लिलावाला अपेक्षित रक्कम मिळू शकली नाही. येथे ‘क्रिस्टी’ नावाच्या आस्थापनाने या तलवारीचा लिलाव आयोजित केला होता. तलवारीची मूळ किंमत १५ लाख ते २० लाख पाऊंड म्हणजे १५ ते २० कोटी रुपये ठेवण्यात आली होती.
वर्ष १७९९ मध्ये टिपू सुलतान हा ब्रिटिशांच्या हातून मारला गेला होता. त्या वेळी ब्रिटनचे तत्कालीन गव्हर्नर जनरल चार्ल्स कॉर्नवॉलिस यांना टीपूच्या वैयक्तिक शस्त्रागारातून २ तलवारी भेट देण्यात आल्या होत्या. एका तलवारीला याच वर्षी झालेल्या लिलावात १४१ कोटी रुपयांना विकण्यात आले. गेल्या साधारण सव्वा तीनशे वर्षांपासून कॉर्नवॉलिस यांच्या वंशजांकडे या तलवारी होत्या. त्यांनी नुकताच त्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला.