सत्याच्या जवळ नेणारा, म्हणजेच सत् चित् आनंद देणारा एकमेव हिंदु धर्म !
हिंदु धर्म काय आहे ? याविषयी ऊहापोह करणारा लेख
विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यशाळेत हिंदुत्वाशी संबंधित विषयांवर चर्चा केली जात होती. चहापानाच्या वेळी मी काही विद्यार्थ्यांना विचारले, ‘‘हिंदु धर्म म्हणजे काय ? हे तुम्ही मला सांगू शकाल का ?’’ या प्रश्नावर सर्वजण शांत राहिले. नंतर थोड्या वेळाने एक मुलगी म्हणाली, ‘‘हिंदु अनेक देवतांना पूजतात.’’ त्यावर मी तिला विचारले, ‘‘हे अनेक देव कुणी निर्माण केले ?’’ आता मात्र पूर्णपणे स्तब्धता होती. कुणीही काही बोलले नाही. नंतर मी विचारले, ‘‘तुम्ही कधी ‘ब्रह्म’ हा शब्द ऐकला आहे का ? सृष्टीचा सृजनकर्ता ब्रह्मा हा देव नव्हे, तर अंतिम सत्य म्हणजे ब्रह्म जे सृष्टीमध्ये असलेल्या प्रकटीकरणामागचा मूळ गाभा आहे. याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का ?’’ त्यांच्यापैकी ‘कुणालाही ब्रह्माविषयी माहिती नाही’, असे लक्षात आले. माझा विश्वासच बसेना. ‘प्राचीन ऋषींनी शोधून काढलेले वेदांच्या स्वरूपातील उच्च तत्त्वज्ञान भावी भारतीय पिढ्यांपर्यंत का पोचले नाही ?’, असा प्रश्न मला पडला.
१. ‘हिंदूंचे तत्त्वज्ञान अद्वैत, म्हणजे ईश्वर आणि मी एकच आहे’, या अत्युच्च स्तरावरचे !
जर्मन तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ यांनी या तत्त्वज्ञानाची पुष्कळ प्रमाणात स्तुती केली आहे. एवढेच नव्हे, तर काही शेकडो वर्षांपूर्वी हे तत्त्वज्ञान युरोपमध्ये पोचले. या घटनेनंतर जेव्हा मी तरुण भारतीय मुलामुलींना भेटत असे आणि त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळत असे, तेव्हा त्यांना ‘तुम्ही मला हिंदु धर्म समजावून सांगू शकाल का ?’, हाच प्रश्न विचारत असे. आतापर्यंत मला कुणीही भारतीय ज्ञानाचा पाया कोणता ? हे सांगितले नाही. ‘भारतीय परंपरेचे स्थान जगातील विविध संस्कृती विचारात घेतल्या, तर ते सर्वांत वरच्या पातळीवर आहे’, हे भारतियांना ठाऊक नाही, असे वाटते. अशा पातळीचे तत्त्वज्ञान जे विचार आणि शब्द यांच्या पलिकडचे असे असून अद्वैत पातळीवरचे, म्हणजे ईश्वर आणि मी एकच आहे. या तत्त्वज्ञानामुळे भारतीय परंपरा नंतर आलेल्या परंपरांच्या नंतरही टिकून आहे. ‘भारतियांना त्यांच्या ऋषींच्या सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञानाविषयी विसर पडून नंतर आलेल्या परंपरांनी भारतीय ऋषींनी सांगितलेले नव्हे, तर नवीन परंपरांकडे सृष्टीच्या निर्मितीविषयी योग्य स्पष्टीकरण आहे’, असा आभास निर्माण केला. निर्माते अनेक असू शकत नाहीत. तो निर्माता एकच सर्वोच्च शक्ती असली पाहिजे.
२. हिंदु धर्म हाच केवळ सत्याकडे जाणारा !
‘ख्रिस्ती आणि इस्लाम धर्म हे एकाच देवाची पूजा करतात’, यावर भर देतात, तर याउलट ‘हिंदू अनेक देवतांची पूजा करतात. त्यामुळे त्यांच्याकडे निवड करण्यासाठी अजून चांगले पर्याय आहेत आणि ते सत्याच्या जवळ जातात’; परंतु बहुतांश हिंदूंना त्यांच्या परंपरेविषयीचे अज्ञान असल्याने ते हिंदु धर्मापासून दूर जात आहेत. खरे म्हणजे हिंदू ‘आम्ही अनेक देवतांची पूजा करतो, यात चुकीचे काय आहे ? तुम्ही ते आमच्यावर सोडा’, असे सूत्र मांडू शकतात. खरे म्हणजे अनेक देवतांची पूजा करण्यात काहीही चुकीचे नाही. उलट तेच योग्य आहे. ‘जगामध्ये पुष्कळ प्रमाणात विविधता असल्याने जगाचा कारभार चालवणारी विविध खाती विविध देवता चालवत आहेत; परंतु या सर्व देवता या एका ब्रह्मामध्ये सामावल्या आहेत, हे हिंदूंना ठाऊक नसल्याने त्यांना इतर दोन्ही धर्म (मुसलमान आणि ख्रिस्ती) योग्य सांगत आहेत’, असे वाटते. खरे म्हणजे स्रोत हा एक आणि एकच असला पाहिजे. जर हिंदूंना आपल्या परंपरेविषयी ठाऊक असेल, तर ख्रिस्ती किंवा इस्लाम यांपेक्षा हिंदु धर्म चांगला आहे; कारण तो सत्याच्या जवळ जातो, हे हिंदू दाखवू शकतात.
३. हिंदु धर्म श्रेष्ठ आहे, हे कशा प्रकारे सांगता येईल ?
ख्रिस्ती आणि मुसलमान पंथ सांगतात की, सृष्टीचा निर्माता हा सृष्टीपासून वेगळा आहे आणि त्या धर्मामध्ये कुणीही ‘मी देवाशी एकरूप झालो’, असे म्हणत नाही. (ख्रिस्ती धर्मात जिझस हा अपवाद आहे. त्याला देवाचा दर्जा देण्यात आला आहे.) परत या दोन धर्मांतील देवाला आवड निवड आहे. ‘जे मला मानत नाहीत, ते लोक मला आवडत नाहीत’, असे या देवाने एका व्यक्तीला सांगितले आणि ते पुस्तकात दिले आहे. ख्रिस्ती धर्माविषयीची व्यक्ती ‘जिझस क्राईस्ट’ आणि त्यांच्या ग्रंथाचे नाव ‘बायबल’ आहे. इस्लाम धर्माविषयी सांगायचे, तर ‘प्रेषित महंमद’ आणि त्यांच्या ग्रंथाचे नाव ‘कुराण’ आहे. या धर्मात ‘जे त्यांच्या देवाला मानत नाहीत, ते देवाला आवडत नाहीत आणि देवावर विश्वास न ठेवणार्यांना हा देव त्यांचा मृत्यू झाल्यानंतर नरकात पाठवतो’, असे सांगितले आहे. हे योग्य वाटत नाही.
आता याची तुलना हिंदु धर्मात काय सांगितले आहे ? याच्याशी करता येईल. हिंदु धर्मात सांगितले आहे, ‘‘जगात निर्माण झालेल्या प्रत्येक वस्तूच्या निर्मितीला ब्रह्म कारणीभूत आहे की, जे आनंददायी, अनंत आणि शुद्ध (विचार आणि जाणीव यांच्या पलिकडे) आहे. ब्रह्मापासून शक्ती निर्माण होऊन जगातील विविधता निर्माण झाली. हे समुद्रावरील लाटांप्रमाणे आहे. या सर्व लाटा एकत्रित असणे, म्हणजे समुद्र. जेव्हा लाट न्यून होते, तेव्हा काहीही वाया जात नाही; परंतु हे सत्याच्या जवळ आहे हे आपल्याला कसे कळेल ? देव हा कुठेतरी आकाशात वेगळा आहे आणि जग हे त्यापासून स्वतंत्र आहे, हे शक्य आहे का ? आता विज्ञानही ‘काहीही वेगळे नाही. सर्वकाही एक आहे आणि एकमेकांशी जोडलेले आहे’, या निष्कर्षाप्रत आले आहे.’’
४. ‘आपण कोण आहोत ?’, हे जाणून त्याची पूर्तता करणे, हेच मनुष्याचे ध्येय !
ऋषींनी दिलेले ज्ञान ही केवळ माहिती नाही, तर ते प्रत्यक्षात आहे. त्याचा अनुभव घेता येतो आणि तो घेतला पाहिजे. स्वतःविषयीची जाणीव आणि आनंद वाटणे, हे कुठे आकाशात नाही, तर ते आपल्या जीवनाचे सार आहे. ‘ऋषींनी त्याचा अनुभव घेतला आणि आपण ते कसे अनुभवू शकतो ?’, याविषयी आपल्याला कल्पना दिली. एक मुख्य कल्पना, म्हणजे स्वतःचे विचार शांत करणे. यामागचे कारण सोपे आहे; कारण विचारांच्या पलिकडे शुद्ध जाणीव म्हणजेच सत् चित् आनंद आहे. जेव्हा आपण विचार थांबवतो, तेव्हा आपण त्याच्याशी जोडले जातो. ‘आपण कोण आहोत ?’, हे जाणून घेणे आणि त्याची पूर्तता करणे’, हे आपल्या आयुष्याचे ध्येय आहे. या मोठ्या जगात आपण एक लहान व्यक्ती नसून जी सर्वांमध्ये असलेली आनंददायी जाणीव आहोत. ‘मृत्यूपर्यंत थांबून नंतर स्वर्गात जाण्याची अपेक्षा धरणे’, हे आपल्या आयुष्याचे ध्येय नाही. आपल्या पूर्ण आयुष्यात आपण केवळ पुस्तकातील शाब्द़िक माहितीवर विश्वास ठेवतो. खरे सत्य हे पुस्तकात किंवा ग्रंथांमध्ये नसून ते आपल्यामध्ये आहे.
मारिया वर्थ, जर्मन लेखिका आणि हिंदु धर्माच्या अभ्यासक
(मारिया वर्थ यांच्या ब्लॉगवरून साभार)