यवतमाळ जिल्‍ह्यात सामूहिक शस्‍त्रपूजन पार पडले !

हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम !

प्रतिकात्मक छायाचित्र

यवतमाळ, २७ ऑक्‍टोबर (वार्ता.) – विजयादशमीच्‍या निमित्ताने युवकांमध्‍ये शौर्य जागृतीसाठी दसर्‍याच्‍या पूर्वसंध्‍येला हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ठिकठिकाणी सामूहिक शस्‍त्रपूजनाचे आयोजन करण्‍यात आले होते. यवतमाळमध्‍ये पुष्‍कळ ठिकाणी सामूहिक शस्‍त्रपूजन करण्‍यात आले. या वेळी मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.