शाळेच्या वाहनात अश्लील व्हिडिओ दाखवून विद्यार्थिनीचा विनयभंग करणार्याला अटक !
वासनांधतेने गाठली परिसीमा !
मुंबई – चेंबूर येथे शाळेच्या वाहनात बसलेल्या इयत्ता ५ वीतील ११ वर्षीय विद्यार्थिनीला भ्रमणभाषमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून वाहनचालकाने तिचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिसांनी आरोपी चालक तुषार भालेराव याला अटक केली.
मुलीने आरडाओरडा केल्यानंतर आरोपीने तिला धमकावले आणि तिला तिच्या घराजवळ सोडले. या प्रकारानंतर पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. आईने विचारपूस केल्यानंतरही ती काहीच सांगण्याच्या मन:स्थितीत नव्हती; मात्र आईने विश्वासात घेतल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला.