ज्‍येष्‍ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार !

नेरूळ – ज्‍येष्‍ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे २६ ऑक्‍टोबर या दिवशी निधन झाले होते. त्‍यांच्‍यावर २७ ऑक्‍टोबर या दिवशी अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. या वेळी त्‍यांना शेवटचा निरोप देण्‍यासाठी सहस्रोंच्‍या संख्‍येने लोक जमले होते.