Love Jihad in Surat : सुरत (गुजरात) येथे अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करणार्या मुसेबला अटक !
मुसेबने इन्स्टाग्रामवरून मुलीला ओढले प्रेमाच्या जाळ्यात !
सुरत (गुजरात) – येथे लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले आहे. यांतर्गत महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर येथील मुसेब जमशेद मणियार नावाच्या युवकाने सुरतमधील एका अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यासाठी त्याने ‘कट्टर मुस्लिम’ नावाचे एक इन्स्टाग्राम खाते बनवले होते. गुजरात पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
२२ वर्षीय मुसेब हा रिक्शाचालक असून त्याने इयत्ता नववीत शिकणार्या १५ वर्षीय हिंदु मुलीला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून स्वत:च्या जाळ्यात ओढले. काही दिवसांनी तो छत्रपती संभाजीनगरहून सुरत येथे आला आणि त्याने त्याचा वाढदिवस साजरा करण्याचे कारण सांगत मुलीला तो थांबलेल्या हॉटेलमध्ये बोलावले. तेथून तिचे अपहरण करून तो फरार झाला. हे लक्षात येताच पीडितेच्या कुटुंबियांनी मुसेदच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. मुसेद मुलीला घेऊन आधी मुंबईला गेला आणि त्यानंतर त्याने राजस्थानमधील अजमेर शहर गाठले. साधारण १५ दिवसांनी महाराष्ट्रात परतत असतांना मुसेबला कर्णावती येथील रेल्वे स्थानकावरून गुजरात पोलिसांनी अटक केली. मुलीला कह्यात घेऊन तिला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. जर चाचणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले, तर मुसेबवर ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाभारतात विविध राज्यांत लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही धर्मांध मुसलमान या कायद्याला न जुमानता लव्ह जिहादचे षड्यंत्र रचतात आणि अनेक वेळा त्यात यशस्वी होतात. त्यामुळे केवळ कायदा करून नव्हे, तर हिंदु मुलींमध्ये लव्ह जिहादच्या विरोधात जागृत करण्यासाठीही आता सरकारने मोहीम हाती घेणे आवश्यक आहे ! |