ओळखपत्राअभावी शेवटच्या वर्षातील २९ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित !
कळंबोली येथील के.एल्.ई. महाविद्यालयाचा भोंगळ कारभार !
पनवेल – कळंबोली येथील कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी (के.एल्.ई) महाविद्यालयात परीक्षेच्या पहिल्याच दिवशी ओळखपत्राअभावी शेवटच्या वर्षातील २९ विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. यामुळे संबंधित पालक आणि मनसेच्या विद्यार्थी सेलचे कार्यकर्ते महाविद्यालयात जमले. महाविद्यालयाने स्वतःची चूक मान्य करून विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा घेणार असल्याचे आश्वासन पालकांना दिले. परीक्षा देता न आल्याने काही विद्यार्थी रडत होते.
संबंधित विद्यार्थ्यांचे पालक महाविद्यालयात आल्यावर तेथे प्राचार्यच उपलब्ध नव्हते. महाविद्यालय व्यवस्थापनाने विद्यापिठाकडे ओळखपत्र मिळवण्यासाठी प्रयत्न चालू असल्याची माहिती पालकांना दिली.
संपादकीय भूमिका :परीक्षेपूर्वीच महाविद्यालयाने सर्व विद्यार्थ्यांना ओळखपत्र मिळाले का, याची निश्चिती केली नाही का ? विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्या महाविद्यालयातील संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! |